By  
on  

Deep-veer Anniversary: पहिल्या भेटीत दीपिकाचा रणवीरबाबत झाला होता हा मोठा गैरसमज

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी येत्या 14 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाची पहिली अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ पासून सुरु झालेली त्यांची लव्हस्टोरी आता ‘83’पर्यंत येऊन पोहोचली आहे. 

रामलीला मध्ये या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा सुरुच होत्या. दीपिकाचं एका गाण्यातील नृत्य पाहून रणवीर तिच्या प्रेमात पडला. बाजीराव मस्तानीमधील केमिस्ट्रीने या दोघांच्या नात्याला चार चांद लावले. पण या जोडीने त्यांच्या प्रेमावर शिक्कामोर्तब केलं ते पद्मावतमधून. 

या तीन सिनेमांमधून लव्ह केमिस्ट्रीचं दर्शन घडवल्यानंतर या जोडीने लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. सर्वात सुंदर ठिकाणी या सुंदर जोडीला एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचं वचन द्यायचं होतं. यासाठी त्यांनी निवड केली इटलीमधील लेक कोमोची. लेक कोमोमध्ये या जोडप्याचा शाही विवाहसोहळा पार पडला. 

या सोहळ्याला एक वर्षं पूर्ण झाली तरी जोडप्यामधील रोमान्स कमी झालेला दिसत नाही. एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाने रणवीरशी पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला होता. दीपिका आणि रणवीरची पहिली भेट एका रेस्टोरंटमध्ये झाली होती. 

त्यावेळी रणवीरचा ‘बॅण्ड बाजा बारात’ सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातील रणवीरच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. त्यामुळे दीपिकाच्या एजंटने तिची रणवीरशी ओळख करून दिली.

दीपिकाने रणवीरचं ‘बॅण्ड बाजा बारात’ मधील काम पाहिलं होतं. त्यामुळे दीपिकाचा असा गैरसमज झाला की रणवीर दिल्लीचा आहे. त्यामुळे तिने रणवीरला विचारलं दिल्लीहून कधी आलास? मुंबईमध्ये नीट सेटल झालास का? यावर रणवीरने तिला सांगितलं की तो दिल्लीचा नाही तर जन्मापासूनच मुंबईत आहे. 


यानंतर दीपिका आणि रणवीरमधील मैत्री फुलत गेली आणि आज ते एकत्र आहेत. दीपिका आणि रणवीर आगामी ‘83’ मधून पहिल्यांदाच ऑनस्क्रीन नवरा-बायको साकारणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive