By  
on  

'मर्दानी 2' Trailer: गुन्हेगारांना धडा शिकवायला पुन्हा येतेय शिवानी राॅय

सध्या भारतात स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार यांसारख्या घटना घडत असतात. याच घटना रोखण्यासाठी पोलीस हरत-हेने प्रयत्न करत असतात. याच घटनांवर अंकुश लावण्यासाठी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी राॅय सज्ज झाली आहे. अर्थात राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

२०१४ साली राणी मुखर्जीचा 'मर्दानी' सिनेमा आला होता. या सिनेमाचं प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून कौतुक झालं होतं. राणी मुखर्जीने रंगवलेली पोलीस अधिकारी शिवानी रॉय सर्वांना आवडून गेली होती. हीच शिवानी रॉय गुन्हेगारांना धडा शिकवायला पुन्हा येणार आहे. 

गोपी पुथरन दिग्दर्शित 'मर्दानी 2' ची निर्मिती यशराज स्टुडिओने केली आहे. हा सिनेमा १३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive