By  
on  

रितेश देशमुख म्हणतो, हाय मै मरजावा !!! पण कुणासाठी म्हणतोय हे जाणून घ्या?

 अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘मरजावां’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. या सिनेमात रितेश व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख त्याचा सहकलाकार आहे. शुटिंग दरम्यान रितेश आणि सिद्धार्थमध्ये उत्तम मैत्री झाली आहे. त्यामुळेच रितेशने त्याच्या या मित्राची फिरकी घेताना जराही मागेपुढे पाहिलं नाही. त्याचं काय झालं सिद्धार्थने त्याचा मॉडेलिंगच्या दिवसातील एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. 

 

 

या फोटोत सिद्धार्थने सिल्व्हर टाईट शॉर्ट्स घातले आहेत. त्यासोबतच त्याने ट्रान्स्परंट टी शर्टही घातला आहे. या फोटोवर कमेंट करताना रितेशने ‘हाय मै मरजावां, रितेश मल्होत्रा ये तो पोझिंग की हाईट हो गयी...’ यावर नेटिझन्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला. पण यावर गप्प बसेल तो सिद्धार्थ कसला ! त्यानेही रितेशचा एक मजेशीर फोटो शेअर केला आहे. तो आपल्या कमेंटमध्ये म्हणतो, ‘हाय मै डर जावां, रितेश देशमुख ये हाईट तो मै मॅच नही कर पाऊंगा’…. आता या दोघांच्या जुगलबंदीवर नेटिझन्स मात्र जाम खुष झाले आहेत.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive