By  
on  

काय सांगता ? तीन अंड्यांचं बिल 1600 रुपये, आणखी एका कलाकाराला फटका

काही महिन्यांपूर्वीच अभिनेता राहुल बोसला पंचतारांकित हॉटेलात 400 रुपयांची तीन केळी मिळाल्यानंतर आता विशाल -शेखर जोडीतला संगीतकार शेखरला आता हॉटेलात 3 अंड्यांसाठी चक्क 1652 रुपयांचं बिल देण्यात आलं आहे. हा ह्यात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलातला प्रकार असल्याचं उघडकीस आलं असून ही अंडी नेमकी कोंबडीची की सोन्याची असाच प्रश्न आता जो तो विचारतोय.न तीन अंड्यांसाठी तब्बल १६७२ रुपये आकारण्यात आल्याचं शेखऱने सांगितलं. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर कमेंटचा वर्षाव होत आहे.

 

 

पंचतारांकित हॉटेलच्या बिलाचा फोटो शेअर करत शेखरने ट्विट केलं . यामध्ये त्याला ३ अंड्यांसाठी चक्क १३५० रुपये मोजावे लागले. सोबतच कराची रक्कम धरुन एकूण बिल १६७२ रुपये झालं. त्यामुळेच त्याने हा फोटो शेअर केला. ३ अंड्यासाठी १६७२? हे जरा जास्त महागडं खाणं आहे नाही?  त्याच्या चाहत्यांनी या बिलावरुन चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive