By  
on  

‘पृथ्वीराज’ च्या शुटिंगला सुरुवात करण्यापुर्वी अक्षय कुमार-मानुषी छिल्लरने केली पुजा

अक्षय कुमारचा एक सिनेमा रिलीज होतो न होतो तोच तो दुस-या सिनेमाच्या तयारीला लागला असतो. आताही अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरने पृथ्वीराज सिनेमाच्या शुटिंग आधीच्या पुजेला हजेरी लावली. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्वीवेदी देखील हजर होते. 

 

 

अक्षय आणि मानुषीने या पुजेचे फोटो सोशल  मिडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी देखील उपस्थित होती. अक्षय या पोस्टला कॅप्शन देताना म्हणतो, ‘पृथ्वीराजच्या जगात पाऊल ठेवण्यापुर्वी ही मंगलमय सुरुवात.’ शूर वीर राजपुत योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमावर आधारलेल्या सिनेमात अक्षय मुख्य भूमिकेत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive