By  
on  

पाहा Photo: 'सायना'च्या शूटींग दरम्यान परिणीतीला झाली दुखापत

भारताची फुलराणी म्हणजेच अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सायनाच्या भूमिकेत बॉलिवूडची परी म्हणजेच अभिनेत्री परिणीती चोप्रा आहे. या सिनेमासाठी ती प्रचंड मेहनत घेतेय. बॅडमिंटनचा कसून सरावसुध्दा ती करतेय.

आपण सायनाला पडद्यावर जिवंत करायचं असा परिणीतीचा अट्टाहास आहे.  पण नुकतंच अलीकडेच, परिणीती चित्रीकरणादरम्यान जखमी झाली असून तिच्या मानेला दुखापत झाली आहे. परिणीतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो तिने चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे.  

फोटोसोबतच सायनाने एक मेसेज लिहला आहे, 'मी आणि 'सायना' सिनेमाची पूर्ण टीम माझी खूप काळजी घेतात. मला कुठं दुखापत होऊ नये, याकडं त्याचं कटाक्षाने लक्ष असतं. पण, तरीही  संपूर्ण खबरदारी घेतली तरी दुखापत ही  झालीच. बॅडमिंटन पुन्हा खेळायला सुरुवात करण्यापूर्वी मी शक्य तितका अधिक वेळ आराम करणार आहे.' असं परिणीतीनं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

'सायना'  बायोपिक परिणीतीपूर्वी अभिनेत्री श्रध्दा कपूर करणार होती पण आपल्या बिझी शेड्यूलमुळे तिला हा सिनेमा सोडावा लागला. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive