By  
on  

Photos: तरुण सरोगेट आईच्या भुमिकेत स्पाॅट झाली कृती सेनन, 'मिमि' मधला लुक झाला व्हायरल

अभिनेत्री कृती सेनन आपल्या उत्तमोत्तम भुमिकांमधुन प्रेक्षकांचं मन जिंकत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल 4' मधुन कृतीने स्वतःमधल्या काॅमिक टायमिंगचं दर्शन घडवलं. 'हाऊसफुल 4' नंतर कृती आगामी 'मिमि' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाशी संबंधित कृतीचा पहिला लुक समोर आला आहे. 

'मिमि' ची शुटींग सध्या राजस्थान येथे सुरु आहे. या शुटींगचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या सिनेमात कृती युवा मुस्लिम सरोगेट आईची भुमिका करत आहे. या फोटोंमध्ये एका सामान्य नान ग्लॅमरस लुकमध्ये कृती पाहायला मिळत आहे. या सिनेमात मराठमोळी सई ताम्हणकर सुद्धा महत्वपुर्ण भुमिकेत झळकणार आहे. 

 

 

'मिमि' हा सिनेमा 2011 साली आलेल्या 'मला आई व्हायचंय' या मराठी सिनेमावर आधारीत आहे. हा सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा लवकरच होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive