By  
on  

रानू मंडलचा नवा अंदाज, नेटिझन्सनी पाडला मीम्सचा पाऊस

सोशल मिडियामुळे एका रात्रीत स्टार झालेल्या रानू मोंड्ल काही ना काही कारणास्तव सतत प्रकाश झोतात असतात. आताही त्या एका नव्याच कारणास्तव चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे नेटक‌-यांना मात्र ट्रोल करण्याची नवी संधी मिळाली आहे. रानू यांचा नुकताच एक नाव लूक समोर आला आहे. या लूकमध्ये रानू ग्लॅमरस लेहंग्यात दिसत आहे. याशिवाय त्यांनी भरगच्च मेक अपही केला आहे. 

रानू यांच्या अति मेक अप लूक व्हायरल होताच काही जणांनी त्यांना ट्रोल केलं तर काही लोकांनी त्यांच्या बाजूने पोस्ट केली. रानू यापुर्वीही प्रकाशझोतात आल्या होत्या. अलीकडेच एका महिलेने अंगाला का हात लावला या कारणावरून त्या भडकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर नेटिझन्सनी टिका देखील केली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive