By  
on  

नीना गुप्तांनी यासाठी आयुष्मान खुराणाचं केलं कौतुक

आयुष्मान खुराणाचे सितारे सध्या चांगलेच तेजीत आहेत. ड्रीम गर्लनंतर त्याचा बाला हा सिनेमाही रसिकांना पसंत पडला आहे. आयुष्मान खुराणा, यामी गौतम आणि भूमि पेडणेकरचा अभिनयही रसिकांना पसंत पडत आहे. पहिल्याच दिवशी  बालाने 10 कोटींचा व्यवसाय केला आहे. बाला सेलिब्रिटींनाही पसंत पडत आहे. नुकताच अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आयुष्मान खुराणाचं बालामधील काम पाहून कौतुक केलं आहे. 

 

 

आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘ सिनेमा खुपच आवडला. आयुष्मान, यामी आणि भूमी तुम्ही उत्तम काम केलं आहे. आयुष्मान प्रत्येक व्यक्तिरेखेत तुम्ही स्वत:ला इतकं गुंतवता की पाहणारा त्याच्या प्रेमात पडतो. खुप प्रेम.’ 
आयुष्मान आणि नीना यांनी ‘बधाई हो’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. यात नीना यांनी आयुष्मानच्या आईची भूमिका साकारली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive