By  
on  

राज मेहताचा 'गुडन्यूज' सह अक्षय कुमारने आजवर २३ नवोदित दिग्दर्शकांसह काम केले

अक्षय कुमार 'हाऊसफुल 4' नंतर 'गुड न्यूज' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा आज आलिशान थाटात पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यात अक्षय कुमारविषयी एक गोष्ट उलगडली ती म्हणजे, अक्षय कुमार हा असा एकमेव भारतीय सुपरस्टार आहे ज्याने आजवर २३ पदार्पणाच्या दिग्दर्शकांसह काम केले आहे. या ट्रेलर लाँन्चच्या वेळेस निर्माता करण जोहर उपस्थित होता. ''इतर अभिनेत्यांना सिनेमा कोण दिग्दर्शित करतंय हा प्रश्न पडतो. परंतु अक्षयला हा प्रश्न कधीच पडत नाही. अक्षय सर्वप्रथम कथेला प्राधान्य देतो.''असं मत करण जोहरने व्यक्त केलं. 

अक्षय कुमारच्या करियरचा आढावा घेतला तर अक्षयने आजवर 23 अशा दिग्दर्शकांसोबत काम केले आहे ज्यांच्या पहिल्या सिनेमांमध्ये अक्षय कुमारने अभिनय केला आहे. राधा कृष्ण जगरलामौदी यांच्या 'गब्बर इज बॅक'(2015), लेखक जोडी साजीद-फरहाद यांच्या एंटरटेनमेंट(2014), साजीद खानच्या हे बेबी(2007), रोहीत धवनच्या देसी बाॅईज(2011), विजत कृष्णा आचार्य यांच्या टशन(2008), अॅन्थनी डिसोजाच्या ब्ल्यु(2009), विपुल शहाच्या आँखे(1993), नीरज वोराच्या (खिलाडी 420), सबीर खानच्या कम्बख्त इश्क(2009), नरेश मल्होत्राच्या यह दिल्लगी(1994), आशीष मोहनच्या खिलाडी 786(2012), शिरीष कुंदर यांच्या जान-ए-मन (2006) आणि गुड्डु धनोआ यांच्या 'ऐलान' या सिनेमांमध्ये अक्षयने काम केले आहे. 

यावर्षी आलेल्या मिशन मंगल या सिनेमात अक्षय झळकला होता. हा सिनेमा दिग्दर्शक जगन शक्ती यांचा पहिला सिनेमा होता. "अक्षय कुमार हा बाॅलिवुडमधील सकारात्मक दृष्टीकोन असलेला कलाकार आहे. स्वतःचं स्टारडम बाजुला ठेवुन तो नव्या दिग्दर्शकांसह काम करायला नेहमी उत्सुक असतो." याचाच अर्थ अनेक नव्या दिग्दर्शकांवर हिट्स आणि फ्लाॅपची पर्वा न करता अक्षय विश्वास ठेवतो.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive