By  
on  

2020च्या स्वातंत्र्यदिना दिवशी रिलीज होणार जॉन अब्राहमचा ‘अ‍टॅक’

अ‍ॅक्टर जॉन अब्राहम अ‍ॅक्शन-थ्रिलर सिनेमा अ‍टॅकची फॅन्स वाट पहात आहेत. जॉनचा अ‍ॅक्शन अवतार पाहण्यासाठी त्याचे फॅन्स कायमच उत्सुक असतात. याच दरम्यान अ‍टॅकच्या रिलीज डेटचा खुलासा झाला आहे. हा सिनेमा 14 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येत आहे. 

 

जॉनने एका वृत्तपत्राशी बोलताना हा खुलासा केला आहे. हा सिनेमा 4 जानेवारीला फ्लोअरवर जाणार आहे. या रिलीज डेटबाबत जॉन म्हणतो, ‘मला विश्वास आहे की या दिवसासोबत माझा संबंध यासाठी नाही की हा केवळ राष्ट्रीय दिवस आहे. पण हा दिवस माझ्या भावनांना हात घालतो. अटॅक राष्ट्रवादाऐवजी राष्ट्रभक्तीला प्रोत्साहन देणारा आहे. लक्ष्य आनंद राज या सिनेमांचं दिग्दर्शन करत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive