Trailer Out : 'गड आला पण सिंह गेला,' पाहा शिवरायांचे मर्द मराठा शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

By  
on  

अजय देवगण स्टारर सिनेमा  'तानाजी: द अनसंग वॉरियर' चा मोस्ट अवेटेड ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.ओम राऊत दिग्दर्शीत या मल्टिस्टारर सिनेमाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शरद केळकर सिनेमात छत्रपती शिवरायांची व्यक्तिरेखा साकारतोय तर अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारतेय. काजल प्रथमच मराठमोळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अपेक्षेप्रमाणेच तानाजीचा हा ट्रेलर दमदार आहे आणि आपल्याला शिवकालीन इतिहासात तो खिळवून ठेवतो. ट्रेलरवरुनच सिनेमाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचलीय. 

 या सिनेमात सैफ अली खान सुद्धा खलनायकाच्या म्हणजे किल्लेदार उदयभान राठोडच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खानने रंगवलेला खलनायक नकारात्मक व्यक्तिरेखेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.'' 

 

पाहा ट्रेलर 

 

 

'तानाजी: द अनसंग वॉरियर' ह्या शिवरायांच्या मर्दमराठ्या शिलेदाराची शौर्यगाथा  सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

 

 

 

 

Recommended

Loading...
Share