By  
on  

‘मर्दानी’च्या निर्मात्यांनी काढला सिनेमाचा ‘सत्य घटनेवर आधारित’चा टॅग

राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला मर्दानी सिनेमाची रसिकांमध्ये उत्सुकता आहे. पण हा सिनेमा रिलीज होण्यापुर्वीच विवादाच्या भोव-यात सापडताना दिसत आहे. या सिनेमाच्या सुरुवातीला कोटा शहर आणि सत्य घटनेवर आधारितचा टॅग येत असल्याने कोटा रहिवासी आणि नेते यांनी या सिनेमाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमातून ‘सत्य घटनेवर आधारित’चा टॅग काढला आहे. 

 

 

याबाबत सिनेमाचे निर्माते गोपी पुथरन म्हणतात, ‘आम्ही ट्रेलरमध्ये असं दाखवलं होतं की या सिनेमाची कथा कोटा शहराशी संबंधित असून सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
त्यामुळे आम्ही हा दावा सिनेमातून काढून टाकत आहोत.’ यानंतर ते म्हणतात, ‘ हा एक केवळ सिनेमा आहे. त्यामुळे कोटा शहराचं नाव केवळ संदर्भापुरतं वापरण्यात आलं आहे. या जनतेच्या भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नाही.’ हा सिनेमा 13 डिसेंबर 2019ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive