By  
on  

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला करीनाचा हा जुना फोटो

अमिताभ बच्चन सोशल मिडियावर बरेच अ‍ॅक्टीव्ह असतात. अनेकदा ते जुन्या आठवणीही फॅन्ससोबत शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. यात एका लहान मुलीला त्यांनी उचलून घेतलं आहे. या फोटोत जया बच्चनही दिसत आहेत. याशिवाय इतर लहान मुलंही दिसत आहेत. ही लहान मुलगी करीना आहे. याशिवाय या फोटोत करिष्मा आणि श्वेताही दिसत आहे.

 

 

याशिवाय अमिताभ यांनी ‘पुकार’ सिनेमाच्या सेटवरून आणखी एक फोटो शेअर केला आहे. यात छोट्या करीनाच्या पायाला जखम झालेली असताना अमिताभ तिला औषध लावताना दिसत आहेत. येत्या वर्षात बिग बींचे अनेक सिनेमे रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. 2020मध्ये ते ब्रम्हास्त्र, गुलाबो-सिताबो, झुंड या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive