By  
on  

बॉयफ्रेंड रोहमन शॉलने सुश्मिताच्या वाढदिवसाचं केलं अनोखं सेलिब्रेशन

भारताची पहिली मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने अलीकडेच तिचा 44 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने सुश्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलने तिच्यासाठी सरप्राईज पार्टी अरेंज केली होती. रोहमनने घराच्या छ्तावर लाईटिंग आणि बलून्सचं डेकोरेशन केलं होतं. सुश्मिता हे सरप्राईज पासून खुपच आश्चर्यचकित झाली होती. 

 

 

तिने सोशल मिडियावर या पार्टीचा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये एक छोटा तंबू उभारला आहे. यात केक ठेवला आहे. यासोबत छोट्या चिठ्ठ्या देखील आहेत ज्यात खुप मेसेज पण आहेत.  
या पार्टीत सुश्मिता आणि तिच्या दोन मुली रेने आणि अलिझा यांनी धमाल केली. या पोस्टला कॅप्शन देताना सुश्मिता म्हणते, ‘मी जे काही मागितलं त्यापेक्षा कितीतरी जास्त मला मिळालं आहे. या सुंदर सरप्राईजसाठी थॅक्यु जान. आय लव्ह यु...’ या वेळी सुश्मिता भावूक झालेली पाहायला मिळाली.

Recommended

PeepingMoon Exclusive