By  
on  

अखेर अर्जुन रामपाल- मेहर जेसिया यांचा कायदेशीर घटस्फोट

बॉलिवूडमधील आणखी एका जोडीचं नातं संपुष्टात आलं आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर जेसिया यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. मंगळवारी या जोडीचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे. बांद्रा फॅमिली कोर्टमध्ये परस्पर समन्वयाने या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. मेहेरनं 30 एप्रिल 2019मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. आता ती दोन्ही मुलींसोबत बांद्रा येथील ड्युप्लेक्समध्ये राहिल. 

 

2011मध्ये ही जोडी विभक्त होणार असल्याचं बोललं जात होतं. तर 2018 मध्ये त्यांनी औपचारिकरित्या याबाबत जाहीर केलं होतं. 1998मध्ये ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकली होती. मेहेरनंतर अर्जुन ग्रॅब्रिएलसोबत नात्यात आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive