By  
on  

सलमानच्या या सिनेमातील अभिनेत्रीने उदरनिर्वाहासाठी घेतला टिफीन सर्व्हिसचा सहारा

सलमान आणि अतुल अग्निहोत्रीसोबत ‘वीरगती’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री पुजा डडवाल सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. उदरनिर्वाहासाठी तिने टिफीन सर्व्हीस सुरु केली आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना तिने सांगितलं की, मी आता जुन्या मित्रांना भेटून कामाची गरज असल्याचं सांगत आहे. मला नक्कीच काम मिळेल. माझ्याकडे आता पैसे नसले तरी आत्मविश्वास नक्कीच आहे. पैसे मिळवण्यासाठी काय करावं हे समजत नाहीये. त्यावेळी दिग्दर्शक राजेंद्र सिंह यांनी मला टिफीन सर्व्हिस सुरु करण्याचा सल्ला दिला. 

यासोबत कामासाठी काही सामान आणि पैसेही दिले. मी सध्या जिथं काम करत आहे. तिथेच राहते आहे. मला विश्वास आहे लवकरच मला सिनेसृष्टीत काम मिळेल. या सगळ्यासाठी मला सलमानला भेटून धन्यवाद द्यायचे आहेत. तो माझ्या मदतीसाठी देवासारखा धावून आला.  

पुजाला मागील वर्षी टी बी झाला होता. त्यावेळी सलमानने तिची मदत करत दवाखान्यात दाखल केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive