By  
on  

'मर्दानी 2'च्या प्रोमोशनसाठी राणी घेणार आठ राज्यांच्या पोलिस दलांची भेट

आजकाल प्रत्येक सिनेमासाठी निरनिराळ्या प्रोमोशन ट्रीक्सचा वापर केला जातो. त्यासाठी हटके मार्ग अवलंबला जातो. संपूर्ण ऑफ-स्क्रीन आणि ऑन-स्क्रीन टीम यासाठी मेहनत घेते. इतर सिनेमांप्रमाणेच 'मर्दानी 2' च्या प्रोमोशनसाठी सिनेमाची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतेय. 

नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्ट्नुसार, 'मर्दानी 2' टीम आठ राज्यांचा दौरा करणार आहे. या दौ-यात नागरिकांच्या रक्षणासाठी सदा तत्पर असणा-या पोलिसांना सलाम ठोकत ही टीम त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहे.  

सुत्रांनुसार, राणी मुखर्जीला देशाच्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणा-या पोलिसांचा खुप अभिमान आहे. तसंच 'मर्दानी 2'चा  संदेश सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि आपल्या पोलिस बांधवासह आपुलकीच्या गोष्टी करण्यासाठी ती हा दौरा करतेय. याच दरम्यान 'मर्दानी 2' चं एक नवं पोस्टर नुकतंच उलगडलं. 

सध्या भारतात स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार यांसारख्या घटना घडत असतात. याच घटना रोखण्यासाठी पोलीस हरत-हेने प्रयत्न करत असतात. याच घटनांवर अंकुश लावण्यासाठी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी राॅय सज्ज झाली आहे. अर्थात राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

गोपी पुथरन दिग्दर्शित 'मर्दानी 2' ची निर्मिती यशराज स्टुडिओने केली आहे. हा सिनेमा १३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive