By  
on  

अक्षय कुमार -प्रियदर्शन ही सुपरहीट जोडी तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकत्र, लावणार कॉमेडीचा तडका

बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमारच्या नवनव्या प्रोजेक्ट्सची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. प्रेक्षकांना खळखळून हसवणे आणि दमदार स्टंटबाजी करत त्यांचं शानदार मनोरंजन करत मनं जिंकणं हे अक्षय पेक्षा जास्त कोणी चांगलं करुच शकत नाही. अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव  यांचा हेराफेरी सिनेमा आठवतोय ना. कित्येकदा पाहूनही मन भरत नाही व दरवेळेस आपण खळखळून हसतो. आता पुन्हा एकदा प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही जोडी कॉमेडीचा तडका लावायला सज्ज झाली आहे. 

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2019 मध्ये बोलताना प्रियदर्शन म्हणाला, मी एक स्क्रिप्ट लिहतोय, त्याची शुटींग पुढील वर्षी सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये शुटींग सुरु होईल. अक्षय आणि प्रियदर्शनच्या जोडीचा सिनेमा पाहण्यास प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive