By  
on  

छोटा नवाब तैमूर आई करिनासाठी बनला शेफ, बनवलं यम्मी आईस्क्रीम

करिना आणि तिचा लेक तैमूर नेहमीच एकमेकांसोबत एन्जॉय करताना पाहायला मिळतात. छोटा नवाब तैमूरला नेहमीच काहीतरी नवीन ट्राय करताना आपण पाहतो. तैमूर हा स्टार किड त्याच्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रसिध्द आहे.  नुकतीच असाच एक धम्माल अनुभव तैमूरने आई करिनासह घेतला. 'गुड न्यूज' सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा आटपून करिना पुन्हा चंदीगढला परतली तिथे ती आमिर खानसोबत 'लाल सिंह चढ्ढा'ची शूटींग करतेय. हा सिनेमा हॉलिवूडपट फॉरेस्ट गम्सवरुन प्रेरित आहे.आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत करिनाने मुलगा तैमूरला घेऊन प्रसिद्द शेफ विजय चौहान यांच्या कुकींग वर्कशॉपला हजेरी लावली. 

करिना आणि तैमूरने  यावेळी दोघांनीही एकसारखे निळ्या रंगाचे टी-शर्ट्स घातले होते. तर दोघेही अॅप्रन घालून किचनमध्ये काम करताना पाहायला मिळाले. ही मायलेकाची जोडी फारच क्युट दिसली. चौहान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर करिना आणि तैमूरचे फोटो शेअर केले आहेत आणि एक कॅप्शन दिलंय. ' बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तैमूर अली खान यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आईसस्क्रीम, आणि केक पाककृतींच्या वर्कशॉपला हजेरी लावली. तैमूरनं आईसाठी आइसक्रीम आणि कप केक बनवले', असं म्हणत त्यांनी चाहत्यांना या भेटीची माहिती दिली.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive