गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यास जास्त परिणाम साधता येतो: अक्षय कुमार

By  
on  

अक्षय कुमारचा आगामी 'गुड न्यूज' या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. एका वेगळ्या विषयावरचा विनोदी सिनेमा म्हणून या सिनेमाकडे बघितले जात आहे. अक्षय कुमारने आजवर अनेक सामाजिक विषयांवरील सिनेमे केले आहेत. 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'पॅडमॅन' यांसारख्या सामाजिक विषयांवरील अक्षयने केलेले सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस  उतरले.

अक्षयचा 'गुड न्यूज' सुद्धा IVF सारख्या तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. याविषयी पत्रकारांनी 'महत्वाच्या गोष्टी विनोदी अंगाने दाखवल्यास प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पोहोचतात का?' असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय म्हणाला,"माझा मुद्दा मला गांभीर्याने दाखवायचा असेल तर माझा सिनेमा डाॅक्युमेंट्रीच्या अंगाने बनवला असता. मला वाटत नाही मी प्रेक्षकांना असा सिनेमा बघायला आवडेल. एक-दोन गाणी, काही अॅक्शन दृश्य आणि काहीसं मनोरंजन या गोष्टींचा वापर करुन आपल्याला जो मुद्दा पोहचवायचा आहे तो आपण नकळतपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवतो."

अक्षयने पुढे IVF तंत्रज्ञानाचं महत्व समजावलं,"या तंत्रज्ञानावर आधारीत हा पहिला सिनेमा आहे. IVF तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक पालकांना मुलं झाली आहेत. त्यामुळे IVF चं महत्व सांगणारा हा सिनेमा आहे." 

अक्षय कुमार, करीना कपुर खान, दिलजीत दोसांज, कियारा अडवाणी यांची प्रमुख भुमिका असलेला राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्युज' हा सिनेमा 27 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share