By  
on  

अक्षय कुमारने रोहीत शेट्टीसोबतच्या 'त्या' व्हिडीओचा केला खुलासा, वाचा सविस्तर

अक्षय कुमारच्या 'गुड न्युज' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तसेच अक्षय कुमार सध्या रोहीत शेट्टीच्या 'सुर्यवंशी' सिनेमाच्या शुटींगमध्ये सुद्धा व्यस्त आहे. मागे काही दिवसांपुर्वी 'सुर्यवंशी' च्या सेटवरचा अक्षय आणि रोहीतशेट्टीचा मारामारीचा प्रँक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

एकुणच फेक न्युजला अक्षय कुमारने या व्हिडीओमार्फत सणसणीत उत्तर दिले. याविषयी अक्षय म्हणाला,"मी आणि रोहीत बाजुलाच बसलो होतो. ही न्युज वाचताच आम्ही दोघेही आश्चर्यचकीत झालो. आता भांडणाची बातमी आलीच आहे तर आम्ही व्हिडीओ बनवुन त्या बातमीच्या 15 मिनीटानंतर आमचा व्हिडीओ अपलोड बनवला."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#BreakingNews - A fallout which might just make your day @itsrohitshetty @katrinakaif

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

यापुढे अक्षय म्हणाला,"काही न्युजमुळे नातेसंबंध बिघडतात. खुप जणांच्या करियरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. मी 30 वर्षांपासुन इंडस्ट्रीत आहे. पण माझ्या डोळ्यासमोर फेक न्युज मुळे मी लग्न मोडलेली बघितली आहेत. खुपवेळेस अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे तुम्हाला मजा येते पण त्या व्यक्तीचं आयुष्य उद्धवस्त होतं. त्यामुळे थोडंसं लक्ष द्यावं एवढीच कळकळीची विनंती. माझ्या आणि ट्विंकलच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टी घडल्या आहेत परंतु अशा गोष्टींना आम्ही कधीच महत्व दिले नाही"

अक्षय कुमार, करीना कपुर खान, दिलजीत दोसांज, कियारा अडवाणी यांची प्रमुख भुमिका असलेला राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्युज' हा सिनेमा 27 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive