By  
on  

पाहा Video: कपिल शर्माने अक्षय कुमारला दिलं हे भन्नाट चॅलेंज

‘कपिल शर्मा’ शो मध्ये अनेक कलाकार ब-याचदा हजेरी लावतात. त्यापैकी सातत्याने हजेरी लावणा-या कलाकारांमध्ये अक्षय कुमारचं नाव आघाडीवर आहे. यापुर्वी अक्षय ‘हाऊसफुल 4’ च्या प्रमोशनसाठी कलाकारांसहित सेटवर आला होता. त्यावेळी अक्षयने नेहमीच्या लवकर उठायच्या सवयीप्रमाणे शोचं शूट सकाळी 6 वाजता ठेवलं होतं. यावेळी कपिलने मात्र अक्षयला आणखी एका अतरंगी कृती करायला सांगितलं आहे. 

 

 

कपिलने टीमसह एक व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात कपिलसह भारती, कृष्णा अभिषेक, किकू शारदा आणि चंदन प्रभाकर हे कलाकार हजर आहेत. हे लोक अक्षयला चॅलेंज देताना म्हणतात, ‘ सगळ्यांना गुड मॉर्निंग, पहाटेचे 3 वाजले आहेत. 
अक्षयजी तुम्हाला आमचं चॅलेंज आहे की मागच्या वेळी तुम्ही आम्हाला सकाळी 6 वाजता उठवलं होतं. यावेळी आम्ही 3 वाजता जागे आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर 4 वाजता शूटला येऊन दाखवा. आम्ही जागे आहोत हीच आहे आमची गुड न्युज.’ त्याच वेळी भारती म्हणते, ‘ तुम्ही या अक्षय सर नारळ पाणी तयार आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive