By  
on  

बाप-लेकाची जोडी करतेय स्क्रीन शेअर, या सिनेमात झळकणार एकत्र

अभिनेता शाहिद कपूर कबीर सिंग सारखा दमदार सिनेमा दिल्यानंतर पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिदच्या 'जर्सी' सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला होता. 'जर्सी' या त्याच्या आगामी सिनेमासोबत आता आणखी एक कलाकार जोडला जाणार आहे आणि तो कलाकार म्हणजे खुद्द शाहिदचे बाब अभिनेते पंकज कपूर आहेत. 

अभिनेते पंकज कपूर आणि शाहिद कपूर ही बापलेकाची जोडी आगामी जर्सी सिनेमात एकत्र झळकणार आहे. पंकज कपूर या सिनेमात प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार असल्याचं बोललं जात आहे. पंकज कपूरसुध्दा जर्सीतल्या आपल्या भूमिकेसाठी खुप उत्साहित आहेत. ते म्हणाले, " शाहिदसोबत काम करणं नेहमीच रोमांचकारी ठरतं. प्रत्येक भूमिका तो समरसून जगतो." 

'जर्सी'  सिनेमाबाबत बोलायचं झालं तर शाहीदसुध्दा ह्या सिनेमासाठी प्रचंड  उत्सुक असून त्याला मूळ तेलुगू सिनेमासुद्दा खुप भावला आहे. आता शाहीद स्टाईलचा 'जर्सी' पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र आतुर झाले आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive