By  
on  

‘पानीपत’ सिनेमाविषयी राज ठाकरेंना काय वाटतं जाणून घ्या

आशूतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानीपत’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. या सिनेमात पानीपतच्या तिस-या युद्धाचा प्रसंग प्रेक्षकांसमोर सादर केला आहे. या सिनेमात अर्जून कपूर सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत तर पार्वतीबाईंच्या भूमिकेत कृती सेनॉन आहे. संजय दत्त अहमशाह अब्दालीच्या भूमिकेत आहे. 

 

 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनीदेखील सिनेमाविषयी मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, ‘पानीपतची लढाई म्हणजे म-हाठेशाहीने हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकिय आणि सांकृतिक आक्रमकांना थोपवणा-या मरहठ्ट्यांचा आविष्कार होता.........’ 
राज यांनी पानीपतच्या ट्रेलरचंही कौतुक केलं आहे. या सिनेमात अनेक मराठमोळे कलाकारही आहेत. गश्मीर महाजनी, रवींद्र महाजनी, कृतिका देव, अर्चना निपानकर यांसह अनेक कलाकार आहेत.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive