By  
on  

उंची आणि गाण्याची थट्टा केल्याबद्द्ल नेहा कक्कर या कॉमेडियनवर उखडली

गायिका नेहा कक्करला अनेकदा उंची वरून ऐकून घ्यावं लागतं. अलीकडेच एका कॉमेडी शोमध्येही हा प्रकार घडला. या शोमध्ये नेहाच्या उंचीवरून विनोद केले गेले. त्यावरून नाराज झालेल्या नेहाने आणि टोनीने सोशल मिडियावर या शो मेकर्सची चांगलीच कानउघडणी केली आहे. 
नेहाने या संदर्भात पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. ‘ती अशा नकारात्मक वातावरणात राहू शकत नाही.’ नेहाने जे झालं ते विसरायला सांगितलं आहे.

 

 

याशिवाय फॅन्सनी केलेल्या सपोर्टसाठी देखील आभार मानले आहेत. सोनी मॅक्स चॅनेलवर प्रसारित होत असलेल्या डॉ. प्राण लेले या शोमध्ये किकू शारदा आणि गौरव गेरा एका उंचीने कमी असलेल्या मुलीची चेष्टा करतात या मुलीचं नाव असतं नेहा शक्कर. त्यामुळे नेहा भडकली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive