By  
on  

'तानाजी'ची शौर्यगाथा आता मराठीत ! या दिवशी ट्रेलर येतोय

ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरुय. कधी सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय, असं प्रेक्षकांना झालं आहे. दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील हा सिनेमा मराठी डब करण्यासाठी पाठिंबा दिला होता.  आता हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार असून लवकरच त्याचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 10 डिसेंबरला तानाजी सिनेमाचा मराठी ट्रेलर सिनेमा भेटीला येतोय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive