By  
on  

नाना पाटेकरांना मीटू प्रकरणी मिऴालेल्या क्लीन चीटप्रकरणी तनुश्रीने केला विरोध

मीटू प्रकरणाची लाट भारतात आणणारी अभिनेत्री तुनश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातला वाद संपता संपेना. नाना पाटेकरांना पोलिसांनी या प्रकरणी क्लिन चीट दिल्यानंतर  आता पुन्हा एकदा तनुश्री प्रकाशझोतात आली आहे. तनुश्रीने अंधेरीच्या रेल्वे मोबाइल मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयात 'प्रोटेस्ट' (निषेध) याचिका दाखल केली आहे. ही याचिका ओशिवरा पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या ब सारांश अहवाला विरोधात आहे. या अहवालानंतरच नाना पाटेकरांना क्लीनचिट मिळाली होती.

तसंच तनुश्रीने या नव्या विरोध याचिकेत नानंना क्लिन चीट देऊन चुकीचा अहवाल तयार करणा-या  अधिका-यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. एवढंच नाही तर या अधिका-यांची नार्कौ टेस्ट करण्यात यावी अशी मागणीसुध्दा तनुश्रीने केली आहे. तसंच तिने याचिकेद्वारे कोर्टात हा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्याचीही मागणी केली आहे. 

नानाच्या विरोधात कोणताही पुरावा न सापडल्याने त्याला क्लीन चीट मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं . भ्रष्ट पोलिस आणि भ्रष्ट कायदे व्यवस्थेकडून अतिभ्रष्ट नानांना क्लीनचीट दिल्याचं म्हणत तनुश्रीनं या निर्णयावर संताप व्यक्त केला होता. 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने हॉर्न ओके प्लीज (२००९) चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान म्हणजेच दहा वर्षांपूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. २०१८ मध्ये  मुलाखतीत तनुश्रीने नानांवर गंभीर आरोप करत हे प्रकारण पोलिसांपर्यंत नेलं होतं. पण सबळ पुरावा नसल्यामुळे नाना यांना क्लीन चिट मिळाली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive