By  
on  

पाहा Video : 'सौदा खरा खरा' या गाण्यावर अक्षय-करिनाने धरला ठेका

अक्षय कुमार आणि करिना कपूर या जोडीचा बहुचर्चित सिनेमा 'गुड न्यूज' लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातलं  'सौदा खरा खरा' या जबरदस्त गाण्यावर सर्वांनाच थिरकायला आवडतं. एका दैनिकाने आयोजित केलेल्या शिखर संमेलनात अक्षय आणि करिनाने चक्क या गाण्यावर ठेका धरला आणि उपस्थितांमध्ये एकच धम्माल उडवून दिली. गायक सुखबीर यांच्या ओरिजनल गाण्याचं हे रिप्राईज्ड व्हर्जन सिनेमात आहे. प्रत्यक्ष गाण्यात करिना नाही, पण तरीही तिने या गाण्यावर अक्षयला जबरदस्त साथ दिली. 

'गुड न्यूज'  सिनेमातील  'सौदा खरा खरा'  या मूळ धम्माल डान्स नंबरमध्ये दिलजीत दोसान्ज, कियारा अडवाणी  आणि अक्षय कुमार आहेत. या गाण्यातल्या अक्षयच्या भन्नाट नागीण डान्सचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. चाहते त्याचा हा डान्स पाहून अक्षरश:वेडावले आहेत. 

 

 

अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेली 'गुड न्यूज' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. राज मेहता दिग्दर्शित हा  सिनेमा २७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 

 

 

(Source: Hindustan Times Leadership Summit)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive