By  
on  

'पानिपत'ची पहिल्या दिवसाची कमाई तुम्हाला माहितीय का?

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' सिनेमा येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. क्रिती सेनॉन,अर्जुन कपूर  आणि संजय दत्त यांसारखी मल्टिस्टारर फिल्मची चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रचंड उत्सुकता होती. हा भव्यदिव्य ऐतिहासिक पट समिश्क्षकांनासुध्दा भावला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाने मात्र पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर ठीकठाक कमाई केली आहे. मात्र या वीकेंडला या कमाईत वाढ होऊ शकते. 

‘पानिपत’ने शुक्रवारी ४.१२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट जवळपास तीन तासांचा असल्याने मल्टिप्लेक्समध्ये शो टाइम देताना थिएटर मालकांना विचार करावा लागत असल्याचं,सिने व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितलं आहे.  याच दिवशी कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९.१० कोटी रुपये कमावले आहेत. कार्तिकचा हा सलग पाचवा हिट सिनेमा ठरतोय.

 

 

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' मध्ये अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊंची व्यक्तिरेखा साकारत आहे तर कृती सेनन पार्वतीबाईंच्या भूमिकेत झळकते आहे. याशिवाय क्रूर, करारी अशा अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त पाहायला मिळतोय. हा ऐतिहासिक सिनेमा ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive