By  
on  

आलिया बनली शेफ, पहिल्यांदाच बनवला हा पदार्थ

अभिनेत्री आलिया अलीकडेच बहीण शाहीन भट्टच्या बूक लाँचवेळी दिसली होती. याप्रसंगी आलिया भावनिक दिसून आली. यानंतर आलियाने तिच्या युट्युब चॅनेलकडे मोर्चा वळवला आहे. अलियाने तिच्या युट्युब चॅनलवरून कुकिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी तिने कुक दिलीप आणि हेड कुक कॅरोल यांचीही चाहत्यांना ओळख करून दिली. यानंतर आलियाने बीटरुट सॅलड ही रेसिपी चाहत्यांनी शेअर केली. यावेळी आलिया पहिल्यांदाच किचनमध्ये काम करताना दिसून आली. 

 

 

आलियाच्या युट्युब चॅनेलचा हा पहिलाच एपिसोड आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ती चाहत्यांशी आणखी काहीव्हिडियो शेअर करेल यात शंका नाही. पण आलियाला स्वयंपाक करताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा मात्र पुर्ण झाली हे नक्की. आलिया आता रणबीरसोबत ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार आहे. याशिवाय वडिलांसोबत ‘सडक 2’, संजय लीला भन्साळींचा 'गंगूबाई काठियावाड़ी',  एस एस राजामौली यांचा 'आरआरआर' हे महत्त्वाचे सिनेमे तिच्या हातात आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive