By  
on  

बॉलिवूडमधील बहिणींची ही जोडी, मोठीला मिळालं यश धाकटी मात्र यशाच्या प्रतिक्षेत

बॉलिवूडमध्ये घराणेशाही नवीन नाही. पण असं असलं तरी इथे शेवटी चालतो तो प्रेक्षकांचा न्याय. प्रेक्षक ज्यांना स्विकारतील ते यशाच्या शिखरावर जातात तर ज्यांना स्विकारत नाहीत ते मागे राहतात. बॉलिवूडमधील काही बहिणींची जोडीही अशीच आहे. या जोड्यांपैकी मोठ्या बहिणीला यश मिळालं मात्र धाकटी बहीण मात्र यश आपल्या नावे करू शकली नाही. पाहुयात अशा कोणत्या जोड्या आहेत.

शिल्पा शेट्टी- शमिता शेट्टी: 
फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर यशस्वी झाली असली तरी धाकटी बहीण शमिता मात्र तितकं यश मिळवू शकली नाही. शमिताने मोहब्बतेमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

काजोल मुखर्जी आणि तनिषा मुखर्जी: 
काजोलचं नाव बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये येतं. पण तिची बहीण शमिता मात्र फारशी चमक दाखवू शकली नाही. सुरुवातीचे काही सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर तनिषाने बंगाली सिनेमांकडे मोर्चा वळवला. 

मलाईका अरोरा आणि अमृता अरोरा: 
मलाईकाने बॉलिवूड्मध्ये स्वत:चं नाणं खणखणीत वाजवलं असलं तरी अमृता मात्र यशस्वी ठरली नाही. मल्टीस्टारर सिनेमांमध्ये झळकूनही अमृताला म्हणावं यश मिळालं नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive