By  
on  

लेकीच्या डेब्युवर आमीर खानने शेअर केली ही पोस्ट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसाठी आता गर्वित करणारा क्षण समोर आला आहे. कारण आमीरची लेक इरा आता दिग्दर्शनात उतरली आहे. इराने एका थिएटर प्रॉड्क्शन कंपनीसोबत दिग्दर्शनातील डेब्यु केला आहे. नुकताच या नाटकाचा प्रिमिअर पार पडला. या पुर्वसंध्येला आमीरने लाडक्या लेकीला सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणतो, ‘"Break a leg @khan.ira Proud of you . Love. a." या नाटकात इराचा भाऊ जुनैदने अ‍ॅक्टींगमध्ये डेब्यु केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Break a leg @khan.ira Proud of you . Love. a.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

 

हे एक इंग्लिश नाटक आहे. ज्याचं नाव ‘यूरिपिड्स मेडिया' आहे. यावेळी युवराज सिंगची पत्नी हेजल कीचदेखील या नाटकात होती. आमीर सध्या ‘लाल सिंह चढ्ढाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत या सिनेमात करीना कपूर झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive