By  
on  

नेटफ्लिक्सच्या आगामी शोमध्ये करण जोहरसोबत दिसणार माधुरी दीक्षित

अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच डिजीटल चॅनेल नेटफ्लिक्सच्या आगामी शोमध्ये अभिनयाची जादू चालवताना दिसणार आहे. विशेष म्हणजे माधुरी या शोमध्ये करण जोहरसोबत दिसणार आहे. नेटफ्लिक्सनेही सोशल मिडियावर हे जाहीर केलं आहे. यासोबतच करणनेदेखील ही गोष्ट फॅन्ससोबत शेअर केली आहे.

 

 

 करण म्हणतो, ‘ आम्हाला ही सौंदर्याची राणी नेटफ्लिक्सच्या आगामी शोसाठी मिळाली आहे. तिच्यासोबत डिजीटल स्क्रीनवर जादू चालवता येईल. धकधक गर्लला डिजीटल स्पेसमध्ये पाहणं प्रेक्षकांसाठीही पर्वणी आहे. यापुर्वी माधुरी एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येही जज बनली होती. तसेच कलंक या सिनेमात देखील भूमिका साकारली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive