By  
on  

कॉमेडीयन कपिल शर्मा झाला बाबा, पत्नी गिन्नीने दिला कन्येला जन्म

छोट्या पडद्यावरुन सर्वांना हसवण्यात नेहमीच पुढाकार घेणारा कॉमेडीयन कपिल शर्माच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन आहे. कपिलची पत्नी गिन्नी छत्रथ हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी खुद्द कपिलनेच आपल्या ट्विटरवरुन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

कपिल आणि गिन्नीची ही आनंद वार्ता समजल्यानंतर बॉलिवूड आणि नेटक-यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गिन्नी आणि कपिल शर्मा हे मागील वर्षी १२ डिसेंबर २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.  

कपिल आणि गिन्नी या जोडप्याच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. आता लग्नाला वर्ष पूर्ण होण्या अगोदरचं हे दोघे आई-बाबा झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये गिन्नीचं बेबी शॉवर कार्यक्रम कपिलने आयोजित केला होता तर त्यानंतर दोघंही बेबी मून साजरा करण्यासाठी कॅनला रवाना झाले होते.  

आता कुटुंबात नव्या सदस्याच्या आगमनाने कपिल आणि गिन्नीच्या संसारात आनंदाची उधळण होवो, हीच सदिच्छा!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive