By  
on  

या कारणासाठी अवॉर्ड सेरेमनी सोडून रागात निघून गेला शाहिद कपूर

कबीर सिंग फेम शाहिद कपूरचा राग पुन्हा एकदा अनावर झाला आहे. त्याला कारण आहे रणवीर सिंग. शाहिदने नुकतीच एका अवॉर्ड शोला हजेरी लावली होती. या शोमध्ये तो परफॉर्मही करणार होता. या दरम्यान सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. रणवीर सिंगला ‘गली बॉय’साठी हा पुरस्कार मिळाल्याचं समजताच शाहिदचा राग अनावर झाला. त्याला कबीर सिंगमधील भूमिकेसाठी पुरस्कार अपेक्षित होता. 

पण हे न घडल्याने त्याने ऐनवेळी परफॉर्मन्स करायलाही नकार दिला. तसेच तो शो सोडून निघून गेला. त्यामुळे ऐनवेळी कोण परफॉर्मन्स करणार हा पेच संयोजकांपुढे पडला होता. त्यांनी वरुण धवनला विनंती केली. त्यावेळी वरुणने हा परफॉर्मन्स सादर केला. यावर शाहिदची  प्रतिक्रिया कळू शकली नाह. एका जवळच्या मित्राने सांगितलं की, ‘शाहिद एक प्रोफेशनल कलाकार आहे. डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला असूनही कमिटमेंट पुर्ण करण्यासाठी तो शोमध्ये परफॉर्म करणार होता पण दुखणं वाढल्याने त्याला अचानक निघून जावं लागलं. आता यात किती तथ्य आहे ते केवळ शाहिदच सांगू शकतो.

Recommended

PeepingMoon Exclusive