By  
on  

लव्हबर्ड्स विरुष्काने असा साजरा केला लग्नाचा दुसरा वाढदिवस

सगळ्यात लाडकं सेलिब्रिटी कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का. ही जोडी आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी फॅन्सनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विराटने त्याचा आणि अनुष्काचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काच्या कपाळावर किस करत आहे आणि ती त्याच्याकडे प्रेमाने पाहात आहे. 

 

 

यासोबतच्या कॅप्शनमध्ये विराट म्हणतो, ‘केवळ प्रेम हे खरं असतं, इतर काहीही सत्य नसतं. त्यातच जेव्हा देवाच्या कृपेने प्रेम करणारा साथीदार आपल्याला लाभतो तेव्हा देवाचे आपण खुपच ऋणी असल्यासारखे वाटते.’ अनुष्कानेही लग्नातला फोटो शेअर करत विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
 या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘दुस-या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे प्रत्यक्ष देवाचा चेहरा पाहणे: व्हिक्टर ह्युगो’.

 

 

 विराट आणि अनुष्का यांचे लग्न इटलीतील टस्कनी या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी झालं. लग्नाआधी कोणतीही जाहीर वाच्यता न करता या जोडीने थेट लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सरप्राईज दिलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive