By  
on  

पाहा Video : 'तानाजी द अनसंग वॉरियर'मधलं 'माय भवानी' गाणं

'तानाजी द अनसंग वॉरियर'मधलं दुसरं गाणं 'माय भवानी' रसिकांच्या भेटीला आलं आहे. अजय देवगण स्टारर आणि ओम राऊत दिग्दर्शित या बहुचर्चित सिनेमात देवीची पूजा अर्चा एखद्या उत्सवाप्रमाणे साजरं करणारं 'माय भवानी'  गाणं हिंदीसोबतच मराठी कनेक्शनमुळे प्रेक्षकांना जास्त भावेल यात शंका नाही. अजय आणि काजोलने या गाण्यावर जबरदस्त ताल धरला आहे. तर तानाजींचा भाऊ सूर्याजी मालुसरेंची भूमिका साकारणारा आपला मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेची झलकसुध्दा यात पाहायला मिळतेय. 

या गाण्यामध्ये भवानी मातेचं महात्म्य सांगितलं असून तिचं कौतुक गान सुरु आहे. तसंच देवीच्या स्तुती सोबतच तानाजींच्या लेकाच्या लग्नाची लगीनघाई सुरु असल्याचंही पाहायला मिळतंय. तर तानाजी,त्यांच्या पत्नी आणि सारेच मावळे या रंगात रंगून गेल्याचं आपण गाण्यात पाहू सकतो. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. महत्त्वाचं म्हणजे हिंदीसोबतच हा सिनेमा आपली मायबोली मराठीतसुध्दा डब होत आहे. 

अभिनेता शरद केळकर सिनेमात छत्रपती शिवरायांची व्यक्तिरेखा साकारतोय तर अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारतेय. काजल प्रथमच मराठमोळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सैफ अली खान सुद्धा खलनायकाच्या म्हणजे किल्लेदार उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे. 

ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive