By  
on  

सलमानने दिले संकेत, दबंग 3 नंतर ‘दबंग 4’ ची पटकथाही तयार

सलमान खान ‘दबंग 3’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा दबंगाईसाठी सिद्ध झाला आहे. दबंग फ्रॅंचाईजीमधील तिसरा सिनेमा आता रसिकांच्या भेटीला येण्यास केवळ एक आठवडा शिल्लक राहिला आहे. यावेळी प्रमोशन दरम्यान एका महत्त्वाच्या बाबीचा खुलासा सलमानने केला आहे. 
सलमान म्हणतो, ‘आम्ही 4थ्या भागाची पटकथाही लिहली आहे.’ पण 4थ्या भागाच्या कथेबद्दल काही भाष्य करणं मात्र त्याने टाळलं.

 

खरं तर मूळ स्क्रिप्ट नुसार चुलबुल पांडेची व्यक्तिरेखा काहीशी डार्क असणार होती. पण सलमान भूमिकेला खास टच देऊन आपलीशी केली. दबंग 3 चं दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं आहे. या सिनेमात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि किच्चा सुदीप आहे. याशिवाय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरदेखील या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा सिनेमा 20 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive