By  
on  

‘गुड न्युज’ च्या प्रमोशनसाठी अक्षयचा हा विनोदी अंदाज तुम्हाला कसा वाटला?

अक्षयचा गुड न्युज सिनेमाचा ट्रेलर रसिकांना आवडत आहे. या सिनेमाची प्रतिक्षा चाहते करत आहेत. या सिनेमासाठी अक्षय, कियारा, दिलजीत आणि करीना प्रमोशनमध्ये बिझी आहेत. या दरम्यानचा एक मजेशीर व्हिडियो अक्षयने चाहत्यांशी शेअर केला आहे.
या व्हिडियोमध्ये गाडीत बसून अक्षय सिनेमातील ‘खोया खोया’ गाणं म्हणत असतो.

 

 

या दरम्यान त्याला कियारा, करीना आणि दिलजीत जॉईन करतात. मग हे चौघेही ‘चंदीगढ मे’ हे गायला सुरु करतात. या व्हिडियोला कॅप्शन देताना अक्षय म्हणतो, ‘ प्रमोशनला जातानाही आमचं प्रमोशन सुरु असतं. गुड न्युजचं हे कार-ए-वां सेशन तुम्हाला कसं वाटलं? तुम्हीही सोबत गा’
आयव्हीएफ आणि पालकत्त्वावर बेतलेला हा सिनेमा राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा 27 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive