By  
on  

Mardani 2 Review: महिलांवरील अत्याचाराला सणसणीत चपराक देणारा सिनेमा

सध्या देशात बलात्कार प्रकरणातील आरोपींना कडक शासन करण्याची मागणी होत आहे. नुकताच रिलीज झालेला राणी मुखर्जीचा मर्दानी 2 हा सिनेमा अशाच काहीशा पार्श्वभूमीवर बेतला असल्याने प्रेक्षक त्यात भावनिकदृष्ट्या गुंतत जातो. 

 

 

कथानक: 
राजस्थानमधील कोटा शहरात एका मुलीवर अनन्वित अत्याचार, बलात्कार करून खुन केला जातो. अशा प्रकारचे आणखीही गुन्हे घडतात. गुन्ह्याची पद्धत सेम असलेल्या सिरिअल रेपिस्ट किलरला (विशाल जेठवा) शोधण्याची जबाबदारी शिवानी शिवाजी रॉय ( राणी मुखर्जी) या अधिका-यावर येऊन पडते. अनेक तर्क, पुरावे यांचा आधार घेत शिवानी या किलरचा शोध कसा घेते हे पाहणं उत्कंठावर्धक ठरतं. 

अभिनय: 
राणी उत्तम अभिनेत्री आहे. जेव्हा ती स्क्रीनवर असते तेव्हा ख-या अर्थाने राज्य करते हे तिने सिद्ध केलं आहे. 2018 मध्ये आलेल्या हिचकीनंतर राणी 2019च्या अखेरीस पडद्यावर दिसली आहे. या सिनेमात विशाल जेठवा हा कलाकार नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. विशालने अर्थातच या भूमिकेचं सोनं केलं आहे. शिवानीच्या रुपाने जणू काही देशातील प्रत्येकाच्या रागाचं प्रतिकच पडद्यावर दिसतं. 

दिग्दर्शन: 
मर्दानी सिनेमाचा साचा सारखा असला तरी कथानकाची पार्श्वभूमी वेगळी आहे. दोन्ही सिनेमातून मह्त्त्वाच्या प्रश्नांना हात घातला आहे. तपास यंत्रणांना सामोरं जाव्या लागणा-या अडचणी दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. राणीचे फॅन असाल तर हा सिनेमा पाहायला जरूर जा.

Recommended

PeepingMoon Exclusive