By  
on  

आपल्या तिस-या वाढदिवसादिवशी तैमूरने करीनाकडे धरला हा हट्ट

20 डिसेंबरला क्युट तैमूरचा तिसरा वाढदिवस आहे. आता या छोट्या नवाबचा वाढदिवस म्हणजे जोरदार असणार यात शंका नाही. आता बेबी तैमुरने मॉम करीनाकडे वाढदिवसाठी एक हटके मागणी केली आहे. एका इव्हेंट दरम्यान करीनाने या गोष्टी शेअर केल्या. या वाढदिवसाला तैमूरने दोन केकची मागणी केली आहे. यापैकी एक केक मोठा असेल तो सांताक्लॉजच्या आकारात असेल. तर दुसरा केक बर्थडे केक असेल.

दोन केक कशासाठी असं विचारल्यावर करीना म्हणते, ‘शेवटी तो ही कपूर आहे.’ तैमूरचा तिसरा वाढदिवस करीना आणि सैफ यावर्षी मुंबईतच साजरा करणार आहेत. करीना सध्या गुडन्युजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने यावर्षी ते परदेशात फिरायला जाण्याची शक्यता कमी आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive