By  
on  

करीना- सैफचा नाही तर तैमूरला आवडतो हा सिनेमा

सुपरक्युट तैमूरविषयी जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतात. करीनालाही अनेक इंटरव्ह्युमध्ये त्याच्याबद्दल प्रश्न विचरले जातात. आताही करीनाला तैमुर कोणते सिनेमे पाहतो याबाबत विचारलं गेलं. यानंतर करीनाने सांगितलं की, तैमूरचा सगळ्यात आवडता सिनेमा आहे ‘द जंगलबूक’. तैमूर हा सिनेमा अनेकदा पाहतो तसेच त्याला या सिनेमातील बघिरा, बल्लू आणि अकिरा ही पात्र आवडतात. 

घरातही तो अनेकदा या पात्रांचे आवाज काढत असतो. पण तो थोडा मोठा झाल्यानंतर मी त्याला जब वी मेट, गोलमाल आणि ओमकारा सारखे सिनेमे पाहण्यासही सुचवणार आहे. ती म्हणते, ‘ तो सध्या जंगल सफारीमध्ये रमला आहे. तो खुप आनंदी मुलगा आहे. अनेकदा त्याला स्टार इमेजमध्ये बसवण्यासाठी प्रयत्न होत असतात. पण तो एक निरागस मुलगा आहे.’करीना आता 27 डिसेंबरला गुडन्युज या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive