By  
on  

सैफ आणि तब्बू स्टारर ‘जवानी जानेमन’चं हे हॉट पोस्टर पाहिलं का?

सैफ अली खान आणि तब्बू स्टारर ‘जवानी जानेमन’ हा सिनेमा काही कारणास्तव पुढे गेल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण आता या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये सैफ हातात बियरची बाटली घेऊन नशेत झोपल्याचं दिसत आहे. त्यासोबत शेजारी दोन मुलीदेखील दिसत आहेत. या पोस्टरवरून सैफ या सिनेमात लव्हरबॉयच्या भूमिकेत दिसणार असल्याच समजत आहे. 

 

 

या सिनेमात सैफ प्रौढ वडिलांच्या भूमिकेत दिसत आहे. तर आलिया फर्निचरवाला टीनजर मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात तब्बूची महत्त्वपुर्ण भूमिका आहे. या सिनेमाचा सुरुवातीचा भाग लंडनमध्ये शूट झाला आहे. या सिनेमातून पुजा बेदीची मुलगी आलिया बॉलिवूड डेब्यु करणार आहे. सैफ या सिनेमाचा सह-निर्माता देखील आहे. हा सिनेमा 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive