
येत्या काही दिवसात अक्षय कुमारचा ‘गुड न्युज’ सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत करीना कपूर, दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी हे कलाकार देखील आहेत. या रिलीजनंतर अक्षय कुटुंबासोबत व्हेकेशनला जाणार आहे. एका इंटरव्ह्यु दरम्यान अक्षयला विचारलं गेलं की ट्विंकल उत्तम लेखिका आहे. पण तू तिचं साहित्य वाचतोस कि नाही?
त्यावर अक्षय म्हणतो, ‘मला ट्विंकलसारखं लिहिता येत नाही. ती उत्तम लिहिते. मी कधी ते वाचतही नाही. आमची विचार प्रक्रिया वेगळी आहे. पण आमचं ट्युनिंग उत्तम आहे.’ ट्विंकलने आतापर्यंत मिसेस फनीबोन्स, द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद आणि बरीच पुस्तकं लिहली आहेत. ती सोशल मिडियावरही परखडपणे मत मांडत असते.