By  
on  

लेकीला केल्या जाणा-या ट्रोलिंग बाबत अजय देवगणने सोडलं मौन

अजय देवगण साध्या ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी त्याने अनेक मुद्द्यांवर खुलून चर्चा केली. अजयने यावेळी न्यासाला ट्रोल करणा-यांविरोधात पहिल्यांदाच मौन सोडलं. अजय म्हणतो, ‘माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी मुलं खुपच दु:खात होती. अशा वेळी घरातील वातावरणही वेगळं असतं. त्यावेळी मीच न्यासाला म्हटलं की जरा बाहेर जाऊन वेळ घालव. थोडं काहीतरी खाऊन ये. त्यावेळी तिच्या वयानुसार तिने अंदाज लावला आणि ती पार्लरला गेली.

 

पण त्याच वेळी ती पार्लरबाहेर स्पॉट झाली आणि ट्रोलिंगला सुरुवात झाली. त्यामुळे तिचा मूड चांगल्या होण्याऐवजी अधिकच बिघडला.’अजय पुढे म्हणतो, स्टार किड्सना अजिबात कोणत्याही परिमितीमध्ये बसवू नये. त्यांच्या फोटोवर येत असलेल्या वाईट कमेंटसमुळे ते अधिकच निराश होतात. कुणावरही टीका करण्याचा लोकांना काय अधिकार आहे? स्टार किड्सना नाहक ट्रोल केलं जाऊ नये इतकंच मला वाटतं.

Recommended

PeepingMoon Exclusive