By  
on  

Birthday Special : मराठी सिनेमात भाईजान पाहुणा कलाकार म्हणून 'लय भारी'च चमकला

अवघ्या बॉलिवूडकर आणि सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भाईजान सलमान खान आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करतोय.  बॉलिवूडमध्ये आपल्या दर्जेदार भूमिकेने सुपरहिटच सिनेमे देणा-या सलमानने रितेश देशमुख अभिनीत आणि निर्मित 'लय भारी' या मराठी सिनेमात एक लहान पण अतिशय लक्षवेधी अशी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारुन तमाम मराठी प्रेक्षकांच्या थेट हदयात स्थान पटकावले. 

'लय भारी' या सिनेमात सलमानने भाऊ ही रितेशसोबत पाहुण्या कलाकाराची लहान भूमिका साकारली, पण त्यातही अप्रतिम मराठी संवादांनी रसिकांना आश्चर्यचकित करुन टाकलं. स्वतः रितेश देशमुखही या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.रितेश म्हणाला होता, 'मोठ्या मनाने त्याने ‘लय भारी’ चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा दर्शवली. सलमानचा मला सार्थ अभिमान आहे.'

सलमान खान आणि आपले मराठमोळे दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांची यारी दोस्ती सर्वांनाच माहितीय. त्यांच्या लेकीने सई मांजरेकरने सलमानच्या दबंग 3 मधून बॉलिवूड पदार्पण केलं. सलमानला मराठीचं प्रेम पूर्वीपासूनच आहे. त्याची आई सलमा खान हया मूळच्या महाराष्ट्रीयनच आहेत. 

सलमान खानचा २०१९ मधील बहुप्रतिक्षित सिनेमा दबंग ३ रिलीज झाल आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला सध्या जबरदस्त लोकप्रियता मिळतेय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive