By  
on  

 स्विर्त्झलँडमध्ये न्यू इअर सेलिब्रेशनसाठी विरुष्कासोबत वरुण-नताशा, पाहा Photos 

नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत आहे. सेलिब्रिटींच्या न्यू इअरची तर मग बातच निराळी. आपल्या आवडत्या डेस्टिनेशनवर नवीन वर्षाचं स्वागत करायला कोणाला नाही आवडणार. हॉट कपल म्हणजेच टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या  स्विर्त्झलँडमध्ये न्यू इअर सेलिब्रेशनसाठी पोहचले असून त्यांचे तेथील हॉलिडेचे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत. इतकंच नव्हे तर बॉलिवूडचा यंगेस्ट सुपरस्टार वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल  हे कपलसुध्दा स्विर्त्झलँडमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी हॉलिडे एन्जॉय करतायत. 

विरुष्का आणि वरुण-नताशा यांनी चौघांचा एकत्र स्विर्त्झलँडमधून एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. त्यावर फॅन्सनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केलाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hello frands ‍️ ! @varundvn @natashadalal88

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

विराट आणि अनुष्का हे बी टाऊन कपल  एकमेकांना नेहमीच आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ देताना दिसतात व नेहमीच विविध ठिकाणं एक्सप्लोअर करताना पाहायला मिळतात. तर वरुणसुध्दा गर्लफ्रेंड नताशासोबत नेहमी क्वालिटी टाईम स्पेंड करताना पाहायला मिळतो. पुढच्या वर्षीच्या त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी यंदा बराच जोर धरला होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive