रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत कतरिना कैफ

By  
on  

रोहित शेट्टीच्या अॅक्शन कॉप ड्रामा सूर्यवंशीमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे हे आपण सर्वच जण जाणतो. सर्वांनाच आता या बहुचर्चित सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. आता या सिनेमातल्या कतरिना कैफच्या व्यक्तिरेखेचा उलगडा झाला आहे. 

नो फिल्टर नेहा या कार्यक्रमात कतरिनाला सूर्यवंशीमधील तिच्या व्यक्तिरेखेबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती या सिनेमात डॉक्टरच्या भूमिकेत असल्याचा खुलासा झाला. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार  आणि अॅक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी यांचा आगामी सिनेमा 'सूर्यवंशी'चे सर्वांना वेध लागले आहेत. या दोघांच्या समीकरणासोबतच सोने पें सुहागा म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफसुध्दा ह्यात अक्षयसोबत झळकतेय. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटोज् सध्या सोशल मिडीयवर बरेच व्हायरल होत आहेत आणि प्रेक्षकांचीसुध्दा त्याला पसंती मिळतेय. 

 

 

'सूर्यवंशी' हा रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारच कतरिना कैफ स्टारर  सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 27 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Recommended

Loading...
Share