By  
on  

अक्षयच्या हातात हात घालून कतरिनाचा बिचवर फेरफटका

 बॉलिवुडमध्ये अशा काही ऑनस्क्रिन जोड्या आहेत ज्यांना स्क्रिनवर पाहणं एक ट्रीट असते. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे खिलाडी अक्षय कुमार आणि इंडियन बार्बी कतरिना कैफ ही जोडी.  ‘हमको दिवाना कर गये’, ‘सिंग इज किंग’, ‘नमस्ते लंडन’, ‘तिस मार खान’, ‘वेलकम’, ‘दे दना दन’ या सिनेमांमध्ये हे दोघं एकत्र दिसले. आणि तेव्हाच प्रेक्षकांना यांची केमिस्ट्री जबरदस्त आवडली. बऱ्याच वर्षांपासून या जोडीला प्रेक्षक ऑनस्क्रिन पाहण्यासाठी उत्सुक होते. आणि आता ही जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. निमित्त आहे रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ सिनेमाचं. 


नुकतच कतरिना कैफ आणि अक्षय कुमार हातात हात घालून बिचवर फेरफटका मारतानाचं चित्र पाहायला मिळालं. आणि हे कतरिनाने स्वत:च तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट केलय. कतरिनाने नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. या फोटोत कतरिना आणि अक्षय हातात हात घालून सोबत दिसत आहेत , शिवाय दिग्दर्शक रोहित शेट्टीही त्यांच्यासोबत आहे. समुर्दकिनारी हे तिघही आनंदात फिरत असतानाचा हा फोटो आहे. 
हा फोटो पोस्ट करत कतरिनाने कॅप्शनमध्ये असं म्हटलय की,  
“ या वर्षाची परफेक्ट सुरुवात...मैत्री, हसणं, हास्य, सेटवर... सगळ्यात चांगल्या क्रू टीमसोबत, सेटवर प्रत्येक दिवस आनंदाने आणि प्रेमाने भरलेला असतो.”

सूर्यवंशी या सिनेमाच्या चर्चेचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रसिद्ध गाणं ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याचा रिमेक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 27 मार्च रोजी ‘सूर्यवंशी’ सिनेमा रिलीज होईल. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive